
मालवण ( सिंधुदुर्ग ) - कोरोना महामारीमुळे गेले 45 दिवस बसस्थानकावर विसावलेली सर्वसामान्यांची लालपरी जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात प्रवाशांच्या मागणीनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकावर परजिल्ह्यातील आणि परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झाले आहे.
मालवण बसस्थानकावर 142 इच्छुक प्रवाशांनी नोंद केली असल्याची माहिती मालवण आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली आहे. यात मध्यप्रदेशमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांची संख्या 41 असून त्या खालोखाल ठाणे 36 आणि मुंबई येथे जाण्यासाठी 21 प्रवाशांनी नोंदणी केली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून इच्छित स्थळी जाण्यासाठी काही अटी व शर्तींच्या आधारे बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक प्रवाशांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. बसमधून फक्त 21 प्रवाशांना प्रवास करता येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात अथवा परराज्यात जाण्यास इच्छुक असलेल्या 21 व्यक्तींचा समूह झाल्यानंतरच शासनाच्या नियमांच्या अधीन राहून बस पुरविण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने जाहीर केले आहे. इच्छुक असलेल्या प्रवाशांच्या नावांची नोंदणी जिल्ह्यात सर्व बस स्थानकावर सुरू केली आहे.
अशी झाली आहे नोंदणी
मालवणात याबाबत मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी 41 प्रवाशांनी तर मुंबई येथे जाण्यासाठी 21, ठाणे 36, पुणे 5, कोल्हापूर 3, जळगाव 12, बेळगाव 1, बोरिवली 10 आणि विजापूर 13 अशी नोंदणी झाली आहे. इच्छुकांनी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तसेच ठरवून दिलेल्या तिकीट दराप्रमाणे रक्कम अदा केल्यानंतर शासनाच्या नियमांना अधीन राहून प्रवासाबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक बोधे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.