रत्नागिरीत `या` मार्गावर धावणार एसटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

रत्नागिरी  जिल्ह्यामध्ये उद्यापासून (ता. 22) एसटी वाहतूक काही प्रमाणात चालू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी एसटीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यामध्ये उद्यापासून (ता. 22) एसटी वाहतूक काही प्रमाणात चालू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी एसटीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार आवश्‍यकतेनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. 32 मार्गावर 52 गाड्या सोडण्यात येणार आहेत. एकावेळी एका गाडीतून 22 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 

कोरोनामुळे राज्यात व रत्नागिरी जिल्ह्यात 22 मार्चपासून एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी एसटीने प्रथम वाहतूक सुरू केली. राज्यात 10 हजार गाड्या धावल्या. आता तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने पूर्ण खबरदारी घेऊन ही वाहतूक करण्यात येणार आहे. 

अशा धावणार गाड्या 

दापोली आगारातून दापोली - रत्नागिरी, दापोली-खेड, दापोली-चिपळूण, दापोली-मंडणगड 
खेड आगारातून खेड-रत्नागिरी, खेड-चिपळूण, खेड-दापाली, खेड-मंडणगड 
चिपळूण आगार-चिपळूण-रत्नागिरी, चिपळूण-खेड, चिपळूण-दापोली, चिपळूण-मंडणगड 
गुहागर आगार-गुहागर-आबलोली-रत्नागिरी, गुहागर-चिपळूण-रत्नागिरी, गुहागर-चिपळूण 
देवरूख आगार-देवरूख-रत्नागिरी, देवरूख-साखरपा-लांजा, देवरूख-चिपळूण 
रत्नागिरी आगार- रत्नागिरी-दापोली, रत्नागिरी-चिपळूण, रत्नागिरी-पाली-राजापूर, रत्नागिरी-नाटे, रत्नागिरी-जयगड 
लांजा आगार-लांजा-पाली-रत्नागिरी, लांजा-काजरघाटी-रत्नागिरी, लांजा-साखरपा-देवरूख, लांजा-राजापूर. 
राजापूर आगार -राजापूर-लांजा-रत्नागिरी, राजापूर-लांजा 
मंडणगड आगार-मंडणगड-रत्नागिरी, मंडणगड-दापोली, मंडणगड-खेड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Starts On Different Route In Ratnagiri