तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाचा नवा फंडा

ST transport service sale a water on bus stand in ratnagiri newly start
ST transport service sale a water on bus stand in ratnagiri newly start
Updated on

रत्नागिरी : एसटीने तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी आणखी एक अफलातून फंडा आणला आहे. माल वाहतूक, खासगी टायर रिमोर्ट, खासगी गाड्यांच्या बॉडी बांधणे, वाहनांची दुरुस्ती एसटी वर्कशॉपमध्ये सुरू करण्याचे विचाराधीन असताना प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध ‘नाथजल’ पाणी देण्याचा नवा फंडा एसटी महामंडळाने सुरू केला आहे. 

टप्प्याटप्प्यात लवकरच एसटीच्या प्रत्येक बसस्थानकात ते विक्रीस ठेवले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही पाणी विक्रीसाठी ठेवणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात एसटीच्या प्रत्येक बस स्थानकात लवकरच हे नाथजल पाणी येणार आहे. बस स्थानक आवारातील उपाहारगृह, हॉटेल, स्टॉलवर हे पाणी उपलब्ध असणार आहे. अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विक्रीसाठी ठेवल्यास विक्रेत्याचे परवाने रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी विक्रीची योजना प्रत्यक्ष अंमलात आली आहे. जिल्ह्यात लवकरच रत्नागिरी एसटी आगारामार्फत ११ बस स्थानकात नाथजल बाटलीबंद पाणी मिळणार आहे. तशी तयारी करण्याची सूचना महामंडळाने एसटी विभागाला दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना अन्य सात विभागात सुरू होणार असून लवकरच ती कोकण विभागात सुरवात केली जाणार आहे. 

अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ नाव

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते. त्याच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव दिले आहे. 

एक दृष्टिक्षेप

- प्रवाशांना एक लिटर बाटलीबंद पाणी १५ रुपयांत मिळणार
- पहिल्या टप्प्यात राज्यातील सात एसटी बसस्थानकात सोय
- कोरोना संकटामुळे बाहेर पडण्यासाठी एसटीचा निर्णय
- सावरण्यासाठी एसटी महामंडळ शोधतेय विविध पर्याय

"कोरोना काळानंतर एसटी मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मालवाहतूूक, टायर रिमोर्ट, वाहन बांधणी, दुरुस्ती आदीचे प्रयोग सुरू आहेत. आता महामंडळाने एसटी बस स्थानकात नाथजल हे बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच जिल्ह्यातील ११ बस स्थानकात पाणी विक्रीसाठी ठेवले जाईल. अन्य कंपनीचे पाणी ठेवल्यास संबंधितांवर कारवाई होईल."

- ए. बी. जाधव, एसटी वाहतूक अधीक्षक, रत्नागिरी
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com