'आग लावणे सोपे आणि विझवणे कठीण ; जाधवांनी पेटवल्या सहा हजार चूली'

State Environment and Tourism Minister Aaditya Thackeray visits for chiplun ratnagiri political marathi news
State Environment and Tourism Minister Aaditya Thackeray visits for chiplun ratnagiri political marathi news

चिपळूण (रत्नागिरी) :  आग लावणे सोपे आणि विझवणे कठीण असते. नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून आमदार भास्कर जाधव यांनी सहा हजार कुटूंबाची चूल पेटवली. सहा हजार तरुणांच्या पोटाची आग विझवली. असे उद्गार राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी रामपूर येथे केले. 
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी रामपूर येथे सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. 

संधीचे करा सोने 
मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थित युवक आणि युवतींशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. युवकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी ठाकरेंनी कोरोना गेलेला नसल्याची जाणीव तरूणांना करून दिली. किती लोकानी मास्क घातला आहे. किती लोकांचा मास्क नाकावर नाही. असा प्रश्‍न त्यांनी मार्गदर्शन करण्यापूर्वी विचारला. नोकरी मिळवण्यासाठी आपण येथे एकत्र जमलो आहोत. पण कोरोना अजून संपलेला नाही. त्याची भिती बाळगण्यापैक्षा जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. ज्यांना महोत्सवात नोकरी मिळेल त्यांनी आपली नोकरी टिकवणे गरजेचे आहे. कारण मोठ-मोठया कंपन्या कामगार कपात करत असताना आपल्याला नोकरी उपलब्ध होत आहेत.या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. 

 धेय्य ठेवून काम करा
तरूणांनी दोन महिने नोकरी केल्यावर ती सोडून दुसर्‍या नोकरीच्या मागे लागू नये. तरूणाईचे मन चंचल असले तरी एका दगडावर पाय ठेवून यशस्वी होण्यासाठी धडपड केली पाहिजे. या वयात मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. ज्या कंपनीत मी काम करत आहे त्या कंपनीच्या वरिष्ठ पदापर्यंत मला पोहचायचे आहे. मलाही एका कंपनीचे मालक व्हायचे आहे. असे धेय्य ठेवून काम केले पाहिजे. आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी नोकरी महोत्सवाचा चांगला उपक्रम हाती घेतला. 

11 हजार तरूणांची मेळाव्यात नोंदणी

11 हजार तरूणांनी मेळाव्यात नोंदणी केली आहे. ज्यांना नोकरी मिळेल ते कुटूंब आमदार जाधव आणि शिवसेनेला कधीही विसरणार नाही. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, योगेश कदम यांनी युवकांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी नोकरी महोत्सव घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. जिल्हाध्यक्ष सचिन कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यावेळी उपस्थित होते. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com