दुप्पट तिप्पट एसटी भाडे, आमच्याकडे इतके पैसे नाहीत ; मजूरांनी करायचं काय ?

The state government arranged ST to go to the village but doubled or tripled the fare
The state government arranged ST to go to the village but doubled or tripled the fare
Updated on

चिपळूण - चिपळूण आगारातून बुलढाणा, भंडारा येथे एस.टी जाणार असल्याने चिपळूण, खेड, व गुहागर, रत्नागिरी येथील मजूर व नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी आले. मात्र यातील मजूरांकडे गावी जाण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच हजार एवढे पैसे नव्हते. अधिकारी व कर्मचार्‍यांनी या मजूरांना गावी पाठविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तेवढी रक्कम जमली नाही. तिकाटाची जुळणी होत नसल्याचे शेवटी या मजूरांनी घरचा रस्ता धरला.

परराज्यातील मजुरांची अवस्था बिकट असताना आता राज्यभरातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर व लोकांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य शासनाने गावी जाण्यास एसटीची व्यवस्था केली पण दुप्पट तिप्पट भाडे ऐकून प्रवासी बेजार झाले आहेत. गावी जायचंय पण तिकीटासाठी पैसेच नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. चिपळूण आगारातून आज शनिवारी भंडारा व बुलढाणा या दोन एसटी बस सोडण्यात येणार होत्या. महसूल प्रशासनाने गुहागर, खेड, दापोली, रत्नागिरी तहसीलदारांकडे संपर्क साधून सर्व प्रवाशांना चिपळूणात बोलावले होते. त्यानुसार काही मजूर व अडकलेले लोक सकाळ पासून एसटी स्थानकात दाखल होत होते. मात्र एसटी भरेल इतकी प्रवासी संख्या होत नव्हती.

एक गाडी सुटण्यास 22 प्रवासी आवश्यक होते. मात्र  भंडारा येथे जाण्यास 12 प्रवासी होते. त्यांना प्रत्येकी पाच ते सात हजार रुपये तिकीट होत होते. त्यामुळे लोटे येथून आणखी 6 कामगार गावी जाण्यास तयार झाले व चिपळूणात आले. तिकीट दर ऐकून ते माघारी फिरले. त्यांना गावी जायचे होते. पण पुरेसे पैसे नव्हते. अखेर उरलेले 11 प्रवासी देखील हे पैसे देण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे भंडारा एसटी बस रद्द करण्यात आली. गोंधळे,मजरे,कोंढर येथून बुलढाणा येथे जाण्यास आलेल्या मजुरांची पुरती ससे होलपट  झाली. मुलं बाळांसहित आलेले 11 जण गोंधळे येथे बंधार्‍याचे काम करत होते. एसटीने गावी मजुरांना गावी पाठविण्यासाठी ग्रामसेविका वर्षा शिंदे व तलाठ्यांनी त्यांना चिपळूणात आणले. बुलढाण्यापर्यंत नियमीत एसटी तिकीट 1300 रूपये आहे. मात्र 11 जणांना प्रत्येकी 5 हजार मोजावे लागणार होते. त्यांच्याकडे केवळ 4 हजार रूपये होते. शेवटी नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठ्यांनी मजूरांच्या तिकीटासाठी 55 हजार रूपये पैसे जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढी रक्कम त्वरित शक्य नव्हती. तोपर्यंत सोमवारपासून मोफत एसटी धावणार असल्याचे समजताच मजूरांना पुन्हा गोंधळे गावी पाठण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com