मुख्यमंत्र्यांना घातले साकडे ; नाभिक व्यावसायिकांनी मांडले आपले गार्‍हाणे....

a statement to the chief minister regarding the urgent help from the chief minister's assistance fund kokan marathi news
a statement to the chief minister regarding the urgent help from the chief minister's assistance fund kokan marathi news
Updated on

साडवली (रत्नागिरी) :देशात, राज्यात कोरोना विषाणूची महामारी जोरात फैलावत आहे. आपल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील कोरोना संकटाचा सामना सगळी जनता करीत आहे.राज्यात महाराष्ट्र सरकारने संचारबंदी, लाँकडाऊन सारखे चांगले निर्णय घेऊन कोरोना विषाणूचा प्रभाव, प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक योजना अमलांत  आणल्या आहेत मात्र लाॅकडावुन काळात सलुन व्यावसायिंकावर उपासमारीची पाळी आली आहे .म्हणुन मुख्यमंञ्यानी सहाय्यता निधितुन सलुन व्यावसायिंकांना मदत करावी असे रत्नागिरी जिल्हा सलुन संघटनेने मुख्यमंञ्यांना निवेदन दिले आहे.

रोज कमवील तरच रोज खाईल

लाॅकडावुन काळात आमचा कष्टकरी हातावर पोट भरणारा सलून व्यवसाय त्यात चांगलाच होरपळून निघाला आहे. गेल्या आठ दहा दिवसापासून त्याची रोजीरोटी बंद झाली आहे.त्याची रोजची परिस्थिती म्हणजे रोज कमवील तरच रोज खाईल
अशी आहे.आणि येणारा पुढील काळ किती दिवस,वेळ खाईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाही. त्यामुळे रोजंदारीवर व्यवसाय करणारा सलून व्यवसायिक हतबल झाला आहे.त्याच्यापुढे आर्थिक संकट उभे राहीले आहे.काय करावे सुचत नाही,असे निवेदनात नमुद केले आहे.

अचानक आजारी पडला तर करायचे काय?

प्रत्येक सलून व्यावसायिकांचे कमीतकमी चार ते पाच जणांचे कुटूंब आहे.त्यांची सध्या उपासमार होत आहे.आर्थिक कोंडी झाली आहे. सलून व्यवसाय करणाऱ्याकडे लक्ष द्यायला कोणत्याही पुढा-याला, नेत्याला वेळ नाही सवड नाही. मग सामान्य सलून वाल्यांनी मदत कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. समाधानाची एकच गोष्ट म्हणजे कर्जाच्या हप्त्याची मुदत तिन महीने पुढे ढकलली तेच समाधान आहे.

रोजचा दैनंदिन खर्च,आजारपणात येणारा खर्च तो थांबत नाही तोही करायला पैसे नाहीत.घरात कोणी अचानक आजारी पडला तर करायचे काय? महाराष्ट्र सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहीर केलेली आहे, परंतु त्याच्यात सलून व्यवसाय करणाऱ्यांचा उल्लेख कोठेही नाही याची खंत वाटते हा  सलून व्यवसाय करणाऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच आहे असेही निवेदनात नमुद केले आहे.

नाहीतर सलुन व्यावसायिकांवर आत्महत्येची  वेळ

सलून व्यावसायिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहीर  करावी. जेणे करून कोरोनाचे संकट जो पर्यंत जात नाही टळत नाही तो पर्यंत त्याला एक प्रकारचा आधार मिळेल धीर येईल. नाहीतर सलुन व्यावसायिकांवर आत्महत्येची पाळी येईल असे निवेदनात म्हटले आहे.प्रत्येक तालुका संघटनांनी मिळुन हे निवेदन दिले आहे असे संगमेश्वर तालुका सलुन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष वैभव भोसले यांनी सांगितले.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com