esakal | प्राथमिक शिक्षक समितीने पालकमंत्र्यांकडे केल्यात `या` मागण्या
sakal

बोलून बातमी शोधा

Statement To Guardian Minister For Various Demands Including Recruitment Of Primary Teachers Committee

विविध मागण्यांबाबत पालकमंत्री सामंत यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. याबाबत लवकरच ग्रामविकास विभागाशी शिक्षक भरती व अन्य प्रश्‍नांबाबत संघटना शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात येईल

प्राथमिक शिक्षक समितीने पालकमंत्र्यांकडे केल्यात `या` मागण्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग व कोकण विभागातील अन्य जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदली प्रक्रियांबाबत, प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्‍नांबाबत व विशेष शिक्षक भरतीचा टप्पा राबविण्याबाबत राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखा व सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांना सिंधुदुर्गनगरी येथे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. 

संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सल्लागार सुगंध तांबे, कणकवली शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, कुडाळ शिक्षक नेते शशांक आटक, सातारा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव आदी उपस्थित होते. 

विविध मागण्यांबाबत पालकमंत्री सामंत यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. याबाबत लवकरच ग्रामविकास विभागाशी शिक्षक भरती व अन्य प्रश्‍नांबाबत संघटना शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, निवेदनात दिलेल्या सर्व प्रश्‍नांचा विचार केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका श्री. सामंत यांनी राज्याध्यक्ष शिंदे व शिक्षक समिती शिष्टमंडळासमोर व्यक्त केली. जिल्ह्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईमार्फत जिल्ह्याबाहेरील लेखा परीक्षण टीमकडून जिल्ह्यातील शाळांचे लेखा परीक्षण तालुकास्तरीय कॅम्प तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात येतील, याबाबत संबधित विभागाला सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अशा आहेत प्रमुख मागण्या 

  • दहा पटसंख्येच्या शाळांमधील 138 रिक्त उपशिक्षकांच्या जागा विशेष टप्पा राबवून भरण्यात याव्यात. 
  • शुन्य पटसंख्येच्या 34 शिक्षकांचे तात्काळ समायोजन करावे. 
  • 209 पदवीधर रिक्त पदे सेवेतील विज्ञान शाखेतून डीएड शिक्षकांना विकल्प घेऊन पदोन्नती देण्यात यावी. 
  • आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक 1, 3 व 4 मधील 108 बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे. 
  • जिल्ह्यासाठी 10 टक्के रिक्तपदांची अट शिथिल करावी. 
  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शाळांचे तालुकास्तरीय लेखा परीक्षण कॅम्प पुढे ढकलावे.