esakal | गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश 
sakal

बोलून बातमी शोधा

Stop flyover construction until quality inspection say vinayak raut

खासदार राऊत यांनी आज दुपारी कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या भागाची पाहणी केली.

गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - उड्डाणपूल उभारणीचे काम तातडीने बंद करा. तसेच आत्तापर्यंत उभारणी झालेल्या उड्डाणपुलाची गुणवत्ता तपासणी अहवाल येईपर्यंत पुलाचे पुढील काम सुरू करू नका, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांना आज हायवे ठेकेदार प्रतिनिधींना दिले.
 

खासदार राऊत यांनी आज दुपारी कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उड्डाणपूल उभारणीचे काम थांबविण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले असल्याची माहिती दिली. तसेच उड्डाणपुलाचा सध्या जो भाग कोसळला आहे, तो पूर्णतः काढला पाहिजे. तेथील शिगा आरपार गेलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण स्लॅबला धोका पोचलेला असू शकतो. पुढील काळात अशीच घटना घडली तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे आत्तापासून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले.
 
 उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू असताना पुलाचा स्लॅब कोसळणे ही गंभीर बाब आहे. जनतेच्या तसेच प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना हायवे ठेकेदारासह, त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या कंपनीने वरिष्ठ अधिकारी तैनात करायला हवेत. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत झालेली गटारांचीही कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्याही तक्रारी आपणाकडे आल्याचे राऊत म्हणाले.

हे पण वाचा - गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची अशी होतेय लूट....  


राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे सचिन सावंत, डॉ. प्रथमेश सावंत, राजू राठोड, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुजित जाधव, अनिस नाईक, उमेश वाळके, रिमेश चव्हाण, महामार्ग विभागाचे तांत्रिक सल्लागार एन. के सिंग, दिलीप बिल्डकॉनचे एम. डी. पाटील, श्री.परिहार आदी उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे  
 

loading image
go to top