'त्या' भरकटून अडकून पडलेल्या जहाजाचं नेमकं होणार काय...?

The stray barge is still stuck on the Mirya dam ratnagiri
The stray barge is still stuck on the Mirya dam ratnagiri
Updated on

रत्नागिरी - पहिल्याच पावसात भरकटलेला बार्ज मिर्‍या बंधार्‍यावर अद्यापही अडकून पडलेला असून अमावास्येच्या अजस्त्र लाटांमध्ये त्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. बार्जचा चार मोठ्या दोरखंडाच्या साह्याने बांधून ठेवण्यात आले असून त्यातील एका बाजूचा दोरखंड तुटला आहे. लाटांबरोबरच हेलकावे खाणार्‍या या बार्जमधील इंधनाच्या गळतीचा धोका कायम आहे.

बार्ज फुटण्याची भिती

दक्षिण आफ्रिकेहून शारजा-दुबईला जाणारे इंधनवाहू जहाज ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले होते. खोल समुद्रात त्या बार्जचे इंजिन बंद पडले आणि एका क्रूला हृदयविकाराचा झटका आला होता. या परिस्थितीत बंदर विभागाकच्या सहकार्याने बार्ज रत्नागिरी किनार्‍यावर नर्मदा जेटी परिसरात दाखल झाले. दुसर्‍या दिवशी ‘निसर्ग’ चक्रीवादळात जहाजाचा लंगर तुटला आणि ते भरकटले. सुदैवाने ते जहाज मिर्‍या किनार्‍याला लागले. 3 जुननंतर ते जहाज मिर्‍या येथील बंधार्‍याजवळ अडकून पडले आहे. जहाज बाहेर काढण्यापुर्वी त्यातील 25 हजार लिटर इंधन बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यासाठी टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत बंदर विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे; परंतु अद्यापही इंधन काढण्यात आलेले नाही. रविवारी (ता. 21) अमावास्येच्या दिवशी समुद्राला आलेल्या उधाणात ते जहाज हेलकावे खात बंधार्‍यांच्या दगडावर आपटत होते. उंचच उंच लाटा त्यावर आदळत होत्या. त्यामुळे बार्ज फुटण्याची भिती स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली आहे.

बार्जच्या शंभर मिटर परिसरात ऑईलचा फवारा पसरलेला आहे. त्याचा वास बंधार्‍याजवळ गेल्यानंतर दिसून येत आहे. त्या ऑईलमुळे सध्या धोका नसल्याचे बंदर विभागाकडून सांगितले जात आहे. ऑईल समुद्राच्या पाण्यात मिसळले तर ते खराब होण्याची शक्यता आहे. गेले सतरा दिवस जहाज काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. बार्जचा मागील बाजूचा दोरखंड लाटांच्या मार्‍याने तुटला आहे. त्यामुळे बार्ज बंधार्‍यावरील खडकांवर आदळत आहे. त्यात ते फुटून नुकसान होण्याची शक्यता आहे. उधाणाची स्थिती पाहील्यानंतर ते जहाज बाहेर काढणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. मिर्‍या परिसरात समुद्राच्या पाण्याला प्रचंड ताण असून दुसरे जहाज नेणे अशक्य आहे. संबंधित कंपनीकडून येत्या दोन दिवसा ऑईल काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. मिर्‍या येथे अडकून पडलेला बार्ज बाहेर काढण्यापुर्वी आतील ऑईल काढण्यात येणार आहे. दोन दिवसात त्यावर कार्यवाही होईल. त्यानंतर संबंधित कंपनीमार्फत बार्ज बाहेर काढण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे बंदर विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com