रत्नागिरीत पाच तालुक्यात सोमवारपर्यत कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रत्नागिरीत पाच तालुक्यात सोमवारपर्यत कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रत्नागिरी : ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन पाच तालुक्यात रविवारी (ता. 16) सकाळपासून सोमवारी (ता. 17) पहाटेपर्यत कडक लॉकडाऊन केले असून अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. चक्रीवादळामुळे वारे ताशी 90 किलोमीटर वेगाने वाहतील. त्यामुळे झाडे व घरांची पडझड होण्याची शक्यता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केली.झुम अ‍ॅपवर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘तोक्ते’ कोकण किनारपट्टीला समांतर पुढे गुजरातकडे रवाना होईल.

Strict lockdown ratnagiri in five taluka from Sunday Monday kokan update marathi news

रविवारी सकाळी वेंगुर्ले किनार्‍यांजवळून याचा प्रवास सुरु होईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान राजापूर, आंबोळगड, सागवे, साखरीनाटे या परिसरातून प्रवेश करेल. दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णगडला, पुढे सायंकाळी 4 वाजता रत्नागिरी शहरापर्यंत येईल. सायंकाळी 6 नंतर ते मालगुड, नेवरे, जयगड,रात्री11 वाजता गुहागर किनार्‍यावरुन दापोलीकडे जाईल. सोमवारी (ता. 17) पहाटे 4 ते 5 या कालावधीत दापोली, मंडणगडच्या किनार्‍यावरुन पुढे रवाना होण्याचा अंदाज विंडी या वेबसाईटवरुन वर्तविण्यात आला आहे.

वादळामुळे वार्‍याचा वेग सर्वसाधारण 50 ते 60 किमी राहील. त्याची तिव्रता वाढली तर (विंड गस्ट) ताशी 80 ते 90 किमी वेगाने वाहतील. हा वारा कच्ची घरे, झाडांची पडझड करण्यास पुरेसा आहे. किनार्‍यापासून पाच ते दहा किमीच्या भाग यामुळे प्रभावीत होतील. त्यामुळे सागवे, साखरीनाटे, आंबळगड, पूर्णगड, गणेशगुळे, गोळप, मिरकरवाडा, नेवरे, काजिरभाटी, जयगड, मालगुंड, सैतवडे या गावातील कच्च्या घरातील लोकांना स्थलांतराचे आदेश दिले आहेत.

20 मेट्रीक टन अधिक ऑक्सीजन

वादळानंतर रस्ते सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम आणि हायवे विभागाला सुचना दिल्या आहेत. महावितरणसह सर्व खात्यांना सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांची वीज खंडित होणार नाहीत, याची काळजी घेतली गेली. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवू नये यासाठी 20 मेट्रीक टन जादा साठा उपलब्ध आहे. कोल्हापूरमधून ऑक्सीजनची व्यवस्था केली असून त्यासाठी एक टँकर ठेवण्यात आला आहे.

राजापूरातील 22, रत्नागिरीतील 25 गावांना फटका

पेट्रोल पंप ताब्यात

महावितरणची 44 पथके सज्ज

प्रसंगी सॅटलाईट फोनचा उपयोग

आपत्कालात सामाजिक संस्थांची मदत

Strict lockdown ratnagiri in five taluka from Sunday Monday kokan update marathi news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com