वराड येथे रविवारी विद्यार्थी गुणगौरव

वराड येथे रविवारी विद्यार्थी गुणगौरव

वराड येथे रविवारी
विद्यार्थी गुणगौरव
ओरोसः मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता वराड-हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे. यावेळी कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजातील दहावीमध्ये ८० टक्के आणि बारावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष विनायक परब तसेच मुंबई येथील उद्योजक सुभाष काराणे, उद्योजक देवेन उर्फ पपू ढोलम हे उपस्थित राहणार आहेत. सर्व समाज बांधवांनी आपल्या पाल्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने केले आहे.
..........
‘समाज कल्याण’तर्फे
दिव्यांगांना आवाहन
सिंधुदुर्गः दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी समाजकल्याण विभागामार्फत शारीरिक दिव्यांग व्यक्तींना लघु उद्योगासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या कर्जावर शासन २० टक्के सबसीडी देते. या कर्ज योजनेमुळे दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय करून आपल्या पायावर उभे राहण्यास मदत होते. याबाबत आवाहन करूनही जिल्ह्यातील दिव्यांग बांधव योजनेचा अपेक्षित लाभ घेत नाहीत. जिल्ह्यातील शारीरिक दिव्यांग बांधवांनी शासनाच्या या बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
तन्वी म्हाडगुतचा
कट्टा येथे सत्कार
कुडाळः ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूलची विद्यार्थिनी तन्वी म्हाडगुत हिने बारावी परीक्षेतत १०० टक्के गुण घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल पंचशिल ट्रस्ट ओरोस-आदर्शनगरच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. कट्टा येथील तिच्या निवासस्थानी जात पंचशील ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांनी तन्वीचा शाल, गुलाबपुष्प तसेच ''एक तळमळ'' व ''ही वाट दूर जाते'' या दोन आत्मविचारांचे पुस्तक देऊन सत्कार केला. तन्वीचे पालक उपस्थित होते.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com