Pali Bicycle Distribution
sakal
पाली - सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्रांतीचा एक अनोखा संगम सुधागड तालुक्यातील हातोंड पंचक्रोशीत पाहायला मिळाला. मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांच्या मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या 'द्या एक हात मदतीचा' या सामाजिक उपक्रमाला मुंबईतील गोरेगाव येथील उन्नतनगर अक्षय को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने मोलाची साथ दिली आहे. या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ४५ सायकली, शालेय पाठ्यपुस्तकांचे संच आणि खाऊचे वाटप करण्यात आले.