
-अमित गवळे
पाली: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कोकणकर व प्रवासी आपल्या गावी प्रवास करत आहेत. अशावेळी त्यांच्याकडून खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा वाढीव भाडे आकारतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हरिभाऊ जेजूरकर यांनी केले आहे.