लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी उपमुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

subject of corona and lockdown nilesh rane criticizes on state government in sindhudurg

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी प्रशासनाने कडक निर्बंध घालण्याचे आदेशही दिले आहेत.

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी उपमुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

सिंधुदुर्ग : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांसाठी नियमावली घालून दिली आहे. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी प्रशासनाने कडक निर्बंध घालण्याचे आदेशही दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पुन्हा लॉकडाउन केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान या मुद्दयांवरुन विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठवली आहे. 

भाजपाचे निलेश राणे यांनीही ट्वीटद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, अजित पवार विसरलेत की, ते फक्त उपमुख्यमंत्री नसुन अर्थमंत्रीही आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांनी स्वतः सांगितले पाहिजे की लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा. पुन्हा लॉकडाऊन करुन नोकरी, धंद्यांचे नुकसान होता कामा नये. राज्याला हे परवडणारे नाही. 

हेही वाचा - रत्नागिरीत भैरीच्या शिमगोत्सवाला सुरवात; कोरोनामुळे पालखी भेटीला मोजकेच लोक

दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. सरकारने आता लॉकडाऊन केले तर एक रुपयासुद्धा पॅकेज ते देणार नाहीत. गेल्या वर्षभरात लोक कसे जगले हे तुम्हाला माहित नाही. त्यासाठी तुम्ही झोपडपट्टीत जा. तिथे लोकांना दिवसभर काम केल्याशिवाय रात्री चूल पेटत नाही. गरिबांचे दु:ख मातोश्रीवर बसून कळणार नाही असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

loading image
go to top