पनवेल रोहा रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्याचे काम प्रगतीपथावर

लक्ष्मण डुबे 
Monday, 3 June 2019

रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र चावणे मार्गे खारपाडा रस्त्यावरील खारपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुष्मी गावा जवळ पनवेल रोहा रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे रूळाखालील महत्वाचे काम पूर्ण झाले असुन जोड रस्त्याचे काम जोरात सुरू आहे.

रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र चावणे मार्गे खारपाडा रस्त्यावरील खारपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुष्मी गावा जवळ पनवेल रोहा रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे रूळाखालील महत्वाचे काम पूर्ण झाले असुन जोड रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीस खुल्ला होईल अशी शक्यता आहे. रस्ता वाहतूकीस खुल्ला झाल्यानंतर पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील आणि बाजुच्या गावातील वाहनांना या रस्त्यावरून पेण, अलिबागकडे जाताना प्रवास सुखकारक होणार असल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करत आहे. 

श्री सिध्देश्वरी चावणे मार्गे खारपाडा साधारण बारा किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. त्यापैकी सुरवातीचा चार किलोमीटर एमआयडीसीच्या हद्दीत मोडतो आणि चावणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पेरूचीवाडी ते खारपाडा हा साधारण आठ किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्याखाली आहे. या रस्त्यावरून पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच क्षेत्रा बाहेरील कारखाने तसेच चावणे, जांभिवली, कराडे खुर्द, वडगाव, इसांबे आदि ग्रामपंचायतीच्या हद्दितील वाहनांना पेण, अलिबाग कडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. 

मात्र या रस्त्यावरील खड्डयांमुळे हाल होत असल्याने वाहन चालक नाराजी व्यक्त करत होते. दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण आणि साईडपट्टीचे मुरमाचा भरावा टाकुन मजबूतीकरण काही दिवसांपुर्वी करण्यात आले आहे. रस्त्याची चांगली सुविधा मिळाली आहे. तसेच दुष्मी गावा जवळ वाहनांना पनवेल रोहा रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागत आहे. रेल्वे मार्गावरून रेल्वे गाडी जाताना, गाडी जाई पर्यंत नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी थांबून रहावे लागत आहे. गाडी जाण्यासाठी उशीर झाला, तर गाडी जाई पर्यंत ताटकळत थांबावे लागत आहे. मात्र आता या ठिकाणी रेल्वे रूळाखालून भुयारी रस्ता बांधण्यात आला आहे. यापुढे रूळ ओलंडताना फाटकाची आडकाठी राहणार नाही. त्यामुळे प्रवास सुखकारक होणार आहे. या राज्य मार्गावरून वाहनांची वर्दळ अजुन वाढेल अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली

. सहा महिन्यांपासून कामाला सुरवात केली आहे. आतील उंची साडेचार मीटर आणि रूंदी सहा मीटर इतकी आहे. रूळाखालील महत्वाचे काम झाले आहे. जोड रस्त्याचे काम सुरू आहे. काम पाच जुन पर्यंत पुर्ण करून रस्ता वाहतूकीस खुल्ला करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. असे कंत्राटदाराने सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subway work on the Panvel Roha Railway route is in progress