Success Story: १४० चौरस फुटांच्या शेततळ्यात पॅंगेसीयस प्रजातीचे दोन हजार मासे; शेतकरी तुकाराम तेलगडेंचा अभिनव प्रयोग

मयुरेश पाटणकर
Monday, 7 December 2020

पाटपन्हाळेत तेलगडेंचे कष्ट; पॅंगेसीयस प्रजातीचे दोन हजार मासे, जानेवारीत मिळणार उत्पन्न

गुहागर (रत्नागिरी) :  गेली १० वर्षे भातशेतीबरोबर भाजीपाला, फळबाग लागवड करणाऱ्या तुकाराम तेलगडेंनी यंदा प्रथमच शेततळ्यात मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. १४० चौरस फुटांच्या शेततळ्यात पॅंगेसीयस (Pangasius) या नव्या संकरीत प्रजातीचे सुमारे दोन हजार मासे आहेत. बी.कॉम.ची पदवी घेतलेला त्यांचा मुलगा तेजसही वडिलांना या उपक्रमात मदत 
करीत आहे.

यंदा प्रथमच मत्स्योत्पादन वाढावे, म्हणून केंद्र सरकारने नीलक्रांतीची योजना आणली आहे. त्यापूर्वीच तालुक्‍यातील पाटपन्हाळे गावच्या तुकाराम तेलगडेंनी हरितक्रांतीबरोबर नीलक्रांतीकडे पाऊल टाकले आहे. गेली १० वर्षे भातशेतीसोबत भाजीपाला, कलिंगड लागवड करणाऱ्या या शेतकऱ्यांने चार वर्षांपूर्वी शेततळे बांधले. प्रयोग करणारा शेतकरी असल्याने शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदानाच्या योजनेचा फायदा तुकाराम तेलगडेंना झाला. शेततळ्यात साठणाऱ्या पाण्यावर शेती करत असतानाच मत्स्यशेतीचा विचार आला.

बारामतीत जावून मत्स्यशेतीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर कोल्हापूरमधून पॅंगेसीयस या सहा महिन्यांत पूर्ण वाढ होणाऱ्या माशाच्या नव्या प्रजातीचे मत्स्यबीज विकत आणले. जुलैमध्ये हे 
मत्स्यबीज त्यांनी शेततळ्यात टाकले आहे. पहिलाच प्रयोग असल्याने पाच हजारपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकेल, अशा शेततळ्यात त्यांनी सुमारे दोन हजार माशांची शेती केली आहे. या माशांना दररोज २४० रुपयांचे मत्स्यखाद्य घालावे लागते. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने त्यांना अर्थसहाय्य केले.

हेही वाचा- समुद्राच्या निळ्या लाटांमधून निसर्गाने दिला धोक्याचा इशारा -

घाण बाहेर काढण्याचीही व्यवस्था
मत्स्यशेतीसाठी शेततळे वापरताना माशांची विष्ठा आणि तळाशी साठणारी अन्य घाण बाहेर काढता यावी, म्हणून शेततळ्याच्या तळाला फनेलचा आकार देवून त्यामध्ये एक एचपीचा सबमर्सिबल पंप बसविला आहे. दर चार दिवसांनी या पंपाने तळाशी साठणारी घाण काढून टाकली जाते. तसेच वाऱ्याने तळ्यात तरंगणारा कचरा वाहून जाण्याची व्यवस्थाही आहे. या पाण्याचा वापर ते शेतीसाठी करतात.सव्वा किलो वजनाचे मासे, १२० रुपये किलो दरजानेवारी महिन्यात पूर्ण वाढ झालेले एक ते सव्वा किलो वजनाचे मासे विक्रीसाठी तयार होणार आहेत. १०० ते १२० रुपये किलो दराने हे मासे विकत घेण्यासाठी कोल्हापूर, रत्नागिरीमधील हॉटेल व्यावसायिक, मत्स्य व्यावसायिकांशी बोलणी

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story farmer tukaram telgade ratnagiri