esakal |  रत्नागिरीत असे आहेत निर्बंध ; लॉकडाऊनचा संभ्रम  दूर
sakal

बोलून बातमी शोधा

such restrictions in Ratnagiri second lockdown kokan marathi news

 जिल्ह्यात आज लॉकडाऊनची पोलिस यंत्रणेकडून कडक अंमलबजावणी सुरू झाली. दिवसभर उघडी असलेली बाजारपेठ पोलिसांनी गाडी फिरवत ध्वनिक्षेपकावरून आवाहन केल्यानंतर सायंकाळी संपूर्ण बाजारपेठ व्यापार्‍यांनी बंद केली.

 रत्नागिरीत असे आहेत निर्बंध ; लॉकडाऊनचा संभ्रम  दूर

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  जिल्ह्यात आज लॉकडाऊनची पोलिस यंत्रणेकडून कडक अंमलबजावणी सुरू झाली. दिवसभर उघडी असलेली बाजारपेठ पोलिसांनी गाडी फिरवत ध्वनिक्षेपकावरून आवाहन केल्यानंतर सायंकाळी संपूर्ण बाजारपेठ व्यापार्‍यांनी बंद केली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्व बंद ठेवण्यात आले. यामुळे व्यापारी वर्गांसह सर्वसामान्यांमध्ये असलेला संभ्रम आता दूर झाला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. काही हजारात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने मिनी लॉकडाऊनचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत काहीसा संभ्रम होता. कालपासून हे निर्बंध लागू झाले असली तरी जिल्ह्यात त्याची अंमलबजवाणी झाली नव्हती. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही काल रात्री उशिरा हे निर्बंध जाहीर केले. पहिल्या लॉकडाऊनमधुन सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या छोट्या, मोठ्या व्यापारी, व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती. ते पुन्हा आर्थिक संकटात सापडणार असल्याने व्यापार्‍यांनी या लॉकडाऊनला तीव्र विरोध केला. रत्नागिरीसह चिपळुणमध्येही हा विरोध झाला.

काल सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाची आणि आज उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांची सर्व यंत्रणेबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यास पोलिस यंत्रणेने सुरवात केली. व्यापारी वर्गांमध्ये संभ्रमआवस्था असल्याने दिवसभर मुख्य बाजारपेठेसह सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. सवलत दिल्याचा गैरफायदा नागरिक घेत असल्याने लक्षात आल्यानंतर पोलिस यंत्रणेने दुपारी शहरात गाडी फिलवून सर्व दुकाने बंद केली. आता अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे. त्या व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार
आहेत.

असे आहेत निर्बंध

जिल्ह्यात सकाळ सात ते रात्री आठ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत संचारबंदी लागू राहणार आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 या कालावधीत किराणा दुकाने, धान्य, भाजीपाला, फळ, डेअरी, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, बेकरी, स्वीट मार्ट, अन्नपदार्थांचे हातगाडी, धाबे, हॉटेल, रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा सुरू राहील. मेडिकल, सर्जिकल, पॅथॉलॉजी लॅब व वैद्यकीय सेवा, कृषी सेवा, केंद्र शेती पूरक व्यवसाय, मटन, चिकन अंडी (मासे विक्री तत्सम), अत्यावश्यक सेवेतील एलपीजी गॅस, पेट्रोल, डिझेल, पंप या व्यतिरिक्त सर्व आस्थापना शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

संपादन- अर्चना बनगे

loading image