पाली - सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल भाग आहेत. तालुक्यातील पेडली, भार्जेवाडी व भालगुल या ठिकाणी सागाच्या झाडांची अवैधरीत्या तोड करून साठवणूक करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे.