Raigad News : कडाक्याच्या थंडीचा शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम; गोठा उबदार ठेवण्यासह संतुलित आहार आणि वेळेवर उपचार करण्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन

Winter Health Alert for Goats : सुधागड तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे शेळ्यांमध्ये अंग आखडणे, पाय लटपटणे आणि लकव्यासारखी लक्षणे दिसत आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेळीपालकांना सतर्क राहून वेळीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
Winter Health Alert for Goats

Winter Health Alert for Goats

esakal

Updated on: 

पाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे शेळ्यांमध्ये अंग आखडणे, पाय लटपटणे तसेच लकवा व पक्षाघातसदृश लक्षणे आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शेळी व्यावसायिकांनी तातडीने खबरदारी घ्यावी आणि लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सुधागड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोग मनोहर म्हसकर यांनी केले आहे.

Loading content, please wait...