

Sudhagad Politics
esakal
पाली : राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एक अभूतपूर्व राजकीय धमाका झाला आहे. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद गटासाठी तालुक्याबाहेरील उमेदवार आयात केल्याने स्थानिक निष्ठावंतांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यातूनच आता 'सुधागड सन्मान समिती' नावाच्या नव्या शक्तीचा उदय झाला असून, यात चक्क शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), शेकाप आणि भाजपचेच नाराज गट एकत्र आले आहेत.