सिंधुदुर्गातील 'या' कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक

sunil dhanawade inspector of police sindhudurg local crime investigation presidential medal announced
sunil dhanawade inspector of police sindhudurg local crime investigation presidential medal announced

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांना आज उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले. श्री. धनावडे यांचा जिल्ह्यात सलग तीन वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव होत आहे. 


श्री. धनावडे हे बीकॉम एलएलबी आहेत. 1991 मध्ये थेट भरतीत ते पोलिस उपनिरीक्षक झाले. प्रशिक्षणानंतर त्यांनी नागपूरसह विदर्भात काम केले. पुढे काही काळ ते उच्च पदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठीच्या स्पेशल प्रोटेक्शन युनीटमध्ये कार्यरत होते. 2010 ला पोलिस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. 18 वर्षे त्यांनी ठाणे पोलिस विभागात काम केले. यात उल्हासनगर, महात्मा फुले पोलिस स्टेशन या दोन ठिकाणी निरीक्षक, अतिरीक्त पोलिस आयुक्त ठाणे यांचे रिडर याशिवाय कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्येही त्यांनी काही काळ सेवा बजावली.

1 जून 2017 ला ते सिंधुदुर्गात सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रूजू झाले. या काळात गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण, साखर लूट प्रकरण आदीमध्ये उत्कृष्ट तपास करत गुन्हेगारांना पकडले. सावंतवाडी कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी सुक्ष्म तपास करत तत्कालीन कारागृह अधिक्षक व त्याच्या साथीदारावर स्वतः फीर्याद दिली. इतरही अनेक गुन्ह्यांचा तपास लावला.

3 मार्चपासून ते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याआधी कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल दोन पदके, 2018 मध्ये केंद्राकडून उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार, 2019 मध्ये पोलिस महासंचालक पदक आणि आता एकूण कारकीर्दीचा विचार करून मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com