जाळपोळीची संस्कृती आमची नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

""मी गाडी जाण्याचा प्रश्नच येत नाही. अशा खालच्या थराला जाऊन मी हे कृत्य करणार नाही. मीटर चोरीचा आरोप असणाऱ्या राऊत यांना या प्रकाराचे दुःख कळणार नाही.'' 

सावंतवाडी - आपल्या फायद्यासाठी जाळपोळ करण्याची संस्कृती कोणाची आहे याचा खासदार विनायक राऊत यांनी अभ्यास करावा. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत उसाची शेती, नाट्यमंदिर, दुकाने कोणाची जळाले हे तपासावे; मात्र आमची तशी संस्कृती नाही, असा प्रत्यारोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

माझे फोन रेकॉर्ड तपाण्याची मागणी करणाऱ्या तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या सारखा माझा हप्ते मागण्याचा व्यवसाय नाही, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. खासदार विनायक राऊत यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजू परब यांनीच आपली स्वतःची गाडी जाळली असा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, पंढरीनाथ राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी परब म्हणाले, ""मी गाडी जाण्याचा प्रश्नच येत नाही. अशा खालच्या थराला जाऊन मी हे कृत्य करणार नाही. मीटर चोरीचा आरोप असणाऱ्या राऊत यांना या प्रकाराचे दुःख कळणार नाही.'' 

ते पुढे म्हणाले, ""माझी गाडी जाण्याचा प्रकार हा निंदनीय आहे. त्याच्या मागे नेमकी कोण आहेत त्या संशयितांची नावे मी पोलिसांकडे दिली आहेत. त्याआधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत. परंतु या काळात पुन्हा असा माझ्या सोबत प्रकार झाल्यास त्याला सर्वस्वी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम जबाबदार असणार आहेत. मी आणि माझे कार्यकर्ते सक्षम आहोत त्यामुळे भाजपच्या संरक्षणाची मला गरज नाही.''

शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ""माझे कॉल रेकॉर्ड तपासण्याची पोलिसांकडे मागणी करणाऱ्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख राऊळ आहे यांची चौकशी करावे. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून घ्यावेत. त्यात त्यांनी नेमका कोणाला फोन लावला हे उघड होईल.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunjay Parab comment