सिंधुदुर्ग संवेदनशील जिल्हा ः दाभाडे

अजय सावंत
Sunday, 10 January 2021

डॉ. दाभाडे म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. विविध राजकीय पक्षांमध्ये येथील मतदार विभागला गेला आहे. तरीही राजकीय, सामाजिक सलोखा कायम आहे. सामाजिक व देशप्रेमी घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील व सहकार्यशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - सामाजिक व देशप्रेमी घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील व सहकार्यशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी केले. 
जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय आव्हाने पेलण्यासाठी बळ देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, त्यांचे सहकारी डॉ. व्यंकटेश भंडारी, पल्लवी कामत, पियुषा प्रभू तेंडुलकर यांच्यासह डॉ. दाभाडे यांची डीएसपी कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

डॉ. दाभाडे म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. विविध राजकीय पक्षांमध्ये येथील मतदार विभागला गेला आहे. तरीही राजकीय, सामाजिक सलोखा कायम आहे. सामाजिक व देशप्रेमी घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील व सहकार्यशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या शुभेच्छांचे पाठबळ असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन पोलिस विभागाला सतत सहकार्य करणारे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर अग्रही असतात. हे त्यांनी या सदिच्छा भेटीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.'' 

आदरातिथ्यशीलता हे वैशिष्ट्य 
डॉ. दाभाडे म्हणाले, की आदरातिथ्यशीलता हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. इतर राज्यांच्या सीमा, काही गुन्हेगारी अनिष्ट प्रवृत्तींचा सामना करत असताना पोलिस प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी आहेत; मात्र आजपर्यंत अनेक सक्षम जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभल्यामुळे त्यांनी या सर्वांवर मात करून जिल्ह्याची प्रतिमा मलीन होऊ दिली नाही. 

संपादन - राहुल पाटील

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: superintendent of police rajendra dabhade statement konkan sindhudurg