Raigad News : नाडे गावात अंधश्रद्धेचा पर्दाफाश; पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी, जादूटोणा व नरबळीचा प्रयत्नामुळे भीतीचे वातावरण
Village Awareness : रायगड जिल्ह्यातील नाडे गावात पैशाचा पाऊस पाडण्याच्या विधीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नरबळीचा संशय असलेल्या या प्रकरणावर अंनिसच्या पेण शाखेने गावकऱ्यांसाठी प्रबोधन कार्यक्रम घेतला.
पाली : पेण तालुक्यातील नाडे गावात नुकताच पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी घडला होता. या विधी दरम्यान एका माणसाची नरबळी देण्याची शक्यता होती. ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.