सिंधुदुर्गात केंद्र सरकारच्या कृषी कायदा समर्थनात भाजपचा भव्य ट्रॅक्‍टर मोर्चा

तुषार सावंत
Thursday, 7 January 2021

मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार असुन भाजपचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) : केंद्रातील मोदी सरकारच्या  कृषी कायद्याला समर्थन देण्यासाठी भाजपच्या ट्रॅक्‍टर मोर्चाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती आज सुरुवात झाली आहे. हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार असुन भाजपचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. दोन किलोमीटरवरून ट्रॅक्टर रॅलीने मोर्चाची सुरुवात झाली. 

केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या नव्या कृषी कायद्याच्या समर्थनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. आज सकाळी बारा वाजल्यापासून येथील मुडेश्वर मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे समर्थक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - प्रतिज्ञापत्रात दाखविलेली मालमत्ता कोट्यावधीची 

मुर्डेश्वर मैदानापासून भाजप कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर रॅलीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना कृषी कायदा समर्थनाचे निवेदन दिले जाणार आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये खडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांची फौज उभी करण्यात आली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: support for a law of agricul agriculture BJP fought in sindhudurg today