अडीज हजार किलो गोवंशाचे ,अन्य प्राण्याचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनचालकासह एक संशयित ताब्यात 

suspect detained along with a driver carrying thousands of beef and other animals meat kokan crime news
suspect detained along with a driver carrying thousands of beef and other animals meat kokan crime news
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली सिमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या गस्ती पथकाने काल रात्री 12.30 वाजणेचे सुमारास मंडणगड तालुक्यातील कुंबळे लाटवण मार्गावरील वलौते जवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहन संशयावरून अडवून तपासणी केली असता त्यात सुमारे 2 हजार 500 किलो गोवंशाचे तसेच अन्य प्राण्याचे मांस आढळून आले असून  या प्रकरणी वाहनचालकासह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.  मुद्देमाल व दोन संशयितांना मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सिमाशुल्क विभागाचे अधीक्षक जे.एम.भोईटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या कारवाईबाबत माहिती देताना भोईटे म्हणाले की,

 दापोली सिमाशुल्क विभागाकडून दररोज स्मगलींग विरोधात गस्त घातली जाते. काल रात्री 12.30 वाजतो आमचे गस्ती पथक मंडणगड तालुक्यातील कुंबळे ते लाटवण या भागात गस्त घालत असताना वलौते गावाजवळ आमच्या पथकाला महींद्रा बोलेरो पिकअप व्हॅन क्रमांक एमएच. 01. सीव्ही. 1360 हे वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले या वाहनातून दुर्गंधी येत होती तसेच रक्तही रस्त्यावर पडत असल्याने आम्ही ते थांबवले व या वाहनात काय आहे याची चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आम्ही या वाहनाची तपासणी केली असता या वाहनातून पाणी व रक्त बाहेर पडत असल्याचे आढळले.

वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वाहनात गोवंशाचे व अन्य प्राण्याचे  मांस असल्याचे सांगितले. आमच्या पथकाने या वाहनाचा चालक व अन्य एका संशयिताला वाहनासह ताब्यात घेऊन दापोली येथे आणले. या वाहनाची तपासणी केली असता सुमारे 2 हजार 500 किलो मांस आढळून आले असून या वाहनात 2 कुर्‍हाडी, 4 चाकू, धार लावण्यासाठी 3 कानशी तसेच धार लावण्यासाठी दोन दगड आढळून आले ते जप्त करण्यात आले आहेत.


वाहनाबरोबर असलेले संशयित सईफ अस्लम कुरेशी (रा. कुर्ला, मुंबई) व इर्फान अमीनुद्दीन कुरेशी (रा. गोवंडी, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार  10 ते 12 गोवंशांची तसेच 2 ते 3 अन्य प्राण्यांची कत्तल करुन हे मांस मुंबई येथे या वाहनातून घेऊन चालले होते. सदर मांस हे कुंबळे, वलौते परिसरातील मुनाफ या व्यक्तीकडून घेतले असून ते इम्रान या कुर्ला येथील व्यक्तीकडे  पोच करावयचे असल्याचेही या दोन संशयितांनी सांगितले.

सदर मांस व वाहन संशयितांसह आम्ही मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती अधीक्षक भोईटे यांनी दिली.
या कारवाईत सिमाशुल्क विभागाचे अधीक्षक जे.एम. भोईटे, महेश यादव, भास्कर गायकवाड, निरीक्षक विकास आनंद, अमर मौर्य, मुख्य हवालदार सुहास विलणकर, प्रसन्न शिवलकर, अमित वाडकर, अजिंक्य शिंगारे यांचा समावेश होता.


ऐन शिमग्याच्या काळात गोवंश हत्येसारखे प्रकार मंडणगड तालुक्यातील कुंबळे, वलौते परिसरात घडत असताना  मंडणगड पोलिस करतात तरी काय असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com