हुश्शऽऽऽऽ! त्या संशयित रुग्णास कोरोनाची लागण नाही

The suspect has no infection for corona
The suspect has no infection for corona
Updated on

रत्नागिरी -  संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोनाणे रत्नागितही भिती निर्माण केली होती. कोरोनाची लागण झालेल्या  संशयाने एका तरूणात येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण केले होते. परंतु, त्या रुग्णास कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या तपासणी अहवालात हे स्पष्ट झाले आहे. याबाबत तपासणीचा अहवाल आज सायंकाळी येथे प्राप्त झाला. अहवाल निगेटिव्ह असून त्यास कोणत्याही प्रकारे करोनाची लागण झालेली नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सायंकाळी सांगितले.

हा अहवाल निगेटिव्ह आल्याने करोनाची लागण नाही हे स्पष्ट झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज येथे दिली. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com