चिपळुणात सात वेगवेगळ्या पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू

Suspected death of seven different birds in Chiplun
Suspected death of seven different birds in Chiplun

चिपळूण - दापोलीत कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असतानाच आता चिपळुणातही त्याने प्रवेश केला काय? अशी शंका निर्माण झाली आहे. शहरात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये विविध पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी सात पक्षी मृतावस्थेत आढळून आले असून या घटनेची पशुसंवर्धन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. अधिक तपासणीसाठी हे पक्षी पुणे येथे पाठविले आहेत.
अशातच तालुक्‍यातील सावर्डे, डेरवण, खेर्डी, कापसाळ, पाग आदी ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळून आले.

सध्या स्थलांतरित होणारे जंगली पक्षी, कावळे, कोंबड्या आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुटपालन करणाऱ्या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कोकणातही बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम सातत्याने राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशातच तालुक्‍यातील सावर्डे, डेरवण, खेर्डी, कापसाळ, पाग आदी ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळून आले.

यामध्ये सावर्डे येथे 12 जानेवारी रोजी कबूतर, 13 रोजी डेरवण येथे कोकिळा, 15 रोजी खेर्डी-वरची पेठ येथे कावळा, कापसाळ-डिकेवाडी येथे तीन कबुतरे व 17 रोजी शहरातील पाग-जोशी आळी येथे वटवाघुळ मृतावस्थेत आढळून आले. त्या-त्या भागातील नागरिकांनी हे पक्षी शहरातील मार्कंडी येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या ताब्यात दिले असून या विभागाने अधिक तपासणीसाठी हे पक्षी पुणे येथे पाठविले आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com