पाली - सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वीच एका प्रियकराने आपल्या प्रियसीचा खून करून स्वतः देखील जीवन संपविले होते. ही घटना ताजी असतानाच सुधागड तालुक्यातील नाडसूर येथील कोंडगाव ठाकूरवाडी येथे चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीचा लोखंडी रॉडने मारून खून केला आहे.