'सुवर्ण पालवी' कृषी महोत्सव उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suvarna Palvi Agriculture Festival inaugurated Governor Bhagat Singh Koshyari harnai

'सुवर्ण पालवी' कृषी महोत्सव उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते

हर्णै : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 'सुवर्ण पालवी' कृषी महोत्सव उद्घाटन समारंभाच्या वेळी विविध शेती व मस्त्य शेतीविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल - भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२२ कृषी विद्या विभागांतर्गत मांडलेल्या या प्रदर्शनामध्ये भाताच्या पिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ३१ जाती त्यामध्ये लाल तांदूळ रत्नागिरी - ७, हायब्रीड सह्याद्री, संकरीत सह्याद्री या जातींचा विशेष सहभाग केला होता. कोकणात आंब्याच उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात. त्या आंब्याच्या विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध प्रकारच्या १५० देश विदेशातील जातींच सादरीकरण याठिकाणी केल होत.

माती विनाशती (हायड्रोफॉनिक्स) उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवडी संदर्भात माहिती दिली जात होती. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाल्याच्या विविध जाती तसेच कंदवर्गीय पिकांचे विविध नमुने याठिकाणी प्रदर्शित केले होते. जैविक खते उत्पादनांचे दालन याठिकाणी ठेवण्यात आले होते. जैतंत्रज्ञान वर आधारीत लाल केळी, सफेद वेलची, ग्रांडनाईन केळी या केळ्यांच्या जाती दाखवण्यात आल्या. मत्स्यशेती अंतर्गत शोभिवंत मत्स्यपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, खेकडा पुष्टिकरण आदी प्रकारचे मत्स्यशेती संदर्भातले नमुने याठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

कीटकशास्त्र विभागांतर्गत विविध कीड नियंत्रणाची उपाययोजना, विविध पिकांवरील किडींची व त्यांच्या नियंत्रणाची माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात येत होती. शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे व सर्व यंत्रसामुग्री बाबत माहिती व नमुने याठिकाणी उपलब्ध केले होते. मृद व रसायनशास्त्रातर्गत अन्नपूर्णा ब्रिकेट व आम्रशक्तीचे नमुने याठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच या प्रदर्शनामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत शेळीच्या जातीमध्ये कोकण कन्या व गायीच्या जातीमध्ये कोकण कन्या या जाती आकर्षित ठरल्या होत्या. सौरकुकर सोलर टनेल, ड्रायर यासारखे सौरऊर्जेवर चालणारे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. उद्यानविद्या विभागाने विविध प्रकारच्या जातीच्या फळांपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच बांबू संग्रहालय आणि बांबू वर्कशॉमध्ये तर विविध वस्तूंचे प्रदर्शन आदी तऱ्हेचे प्रदर्शनाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये दापोली कृषी विद्यापीठा बरोबरच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ राहुरी आदी विद्यापीठांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Suvarna Palvi Agriculture Festival Inaugurated Governor Bhagat Singh Koshyari Harnai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top