या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे या किल्ल्यांना ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल.
दापोली : हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला (Suvarnadurg Fort) लवकरच युनेस्कोची (UNESCO) जागतिक ओळख मिळणार आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील चार सदस्यांचे शिष्टमंडळ पॅरिस, फ्रान्स येथे रवाना झाले आहे. त्यामुळे स्थानिकांचेही याकडे लक्ष लागले आहे.