स्वाभिमान सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळली

अमोल टेंबकर
मंगळवार, 12 मार्च 2019

सावंतवाडी -  येथील स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची मोटार जाळण्याचा प्रकार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने पालिकेच्या  अग्निशामक दलास कळवण्यात आले. बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला पण या आगीत गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहे.

हा प्रकार नेमका कोणी केला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु हा प्रकार चुकीचा आहे, आगीची माहिती दिल्यानंतर तब्बल अर्धा तास पोलिस घटनास्थळी आले नाहीत अशी नाराजीही परब यांनी व्यक्त केली.

श्री. परब यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी खासकीलवाडा परिसरातील रोड येथील साई दीपदर्शन या इमारतीच्या समोर पार्क केली होती. बारा वाजण्याच्या सुमारास ते घरी गेल्यानंतर त्यांना रात्री उशिरा गाडी जळत असल्याचा  आवाज आला. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता गाडी पेटत होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ धाव घेतली. घटनास्थळी दारूचे साहीत्य तसेच कॅनचे बुच आढळून आले आहे. त्यामुळे गाडीवर काही तरी ओतून हा प्रकार केला असावा, असा संशय पोलिसांकडुन व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, विनायक ठाकूर, मनोज नाटेकर, प्रवीण परब, प्रदीप गावडे, संदीप राणे, लवू नाईक,  समीर पालव, अमित पोकळे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी हवालदार मंगेश शिंगाडे, किरण कांबळी, अर्जुन गवस, संजय हुंबे, सागर ओटवणेकर आदीसह महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती यादव दाखल झाले होते. उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimaan taluka president Sanju Parab car burnt