रत्नागिरी : शहराजवळील कारवांचीवाडी येथील मुख्य रस्त्यावर स्वस्ती मायक्रो फायनान्स कंपनीची (Swasti Micro Finance Company) मोटार आणि एसटीचा भीषण अपघात (Car-ST Bus Accident) झाला. अपघातामध्ये फायनान्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक ठार झाले. आणखी एक जण किरकोळ जखमी झाला. विकास नौसर (वय ३४, रा. मुंबई) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.