Tariq Garden building collapse
sakal
महाड - महाड शहरांमध्ये सहा वर्षापूर्वी तारिक गार्डन इमारत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता. तर 32 कुटुंब बेघर झाली होती. यानंतर इमारतीच्या जागेबाबत येथील रहिवास्यांनी गृहनिर्माण सोसायटी बनवून अभिहस्तांतरण दस्तऐवज (कन्व्हेयन्स डिड) तयार केला होता. याला न्यायालयाने ग्राह्य धरल्याने व रहिवाशांच्या बाजूने निर्णय दिल्याने तारीक गार्डन बाधित व्यक्तींना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु या रहिवाशांचा संघर्ष मात्र अद्यापही संपलेला नाही.