Cyclone Update : सिंधुदुर्गात 'तौक्ते' चा तांडव

किनारपट्टीलाच जास्त फटका; हवामान खात्याचा अंदाज
Cyclone Update : सिंधुदुर्गात 'तौक्ते' चा तांडव

सावंतवाडी : 'तौक्ते' वादळाने (Cyclone Tauktae) सिंधुदुर्गात (sindhudurg) हाहाकार उडवला आहे. याचा परिणाम काल (15) मध्यरात्रीपासूनच दिसू लागला. हवामान खात्याने (Indian Meteorological Department) किनारपट्टीलाच जास्त फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात किनारपट्टीसह सह्याद्रीच्या (sahyadri ranges) रांगांमध्ये मोठी पडझड झाली. दुपारपर्यंत हे वादळ देवगडजवळील समुद्रात घोंगावत होते. यामुळे वीज, दूरध्वनी यंत्रणा ठप्प झाली आहे. अनेक भागात झाडे पडून रस्ते बंद आहेत. दुपारपर्यंत पूर्ण जिल्ह्यात वादळवी वारे आणि मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू होता. जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. किनारपट्टीवर स्थिती अधिकच गंभीर आहे. समुद्र प्रचंड खवळलेला असून वादळी वारे सुरू आहेत. दुपारनंतर हे वादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकेल असा अंदाज आहे.

Cyclone Update : सिंधुदुर्गात 'तौक्ते' चा तांडव
Tauktae Cyclone Update : रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदीला सुरूवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com