शिक्षकदिन विशेष :  आॅनलाईन शिक्षण मिळाले तरी विद्यार्थी मुकतात शिक्षकाला 

Teacher Day Special Students Miss Teachers In Online Teaching
Teacher Day Special Students Miss Teachers In Online Teaching

रत्नागिरी - कोरोना महामारीच्या काळात बंधनांमुळे आभासी वर्गातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र यामुळे विद्यार्थी शिक्षकाला मुकत आहेत. विद्यार्थ्यांची शिक्षकांकडून समोर बसून शिकताना होणारी जडणघडण, त्याला मिळणारे अप्रत्यक्ष शिक्षण, मिळणारा समाजाचा अनुभव त्यामुळे त्याच्यात तयार होणारी समाजाभिमुखता, सहनशीलता, भावनिकता आणि सहकार्य शिकण्यापासून ही मुले वंचित राहत आहेत. त्यामुळे शिक्षकाने थेट शिकवण्याची आणि शिक्षकाची गरज अधोरेखित होत आहे, अशी भावना बहुसंख्य शिक्षकांनी व्यक्त केली. 

ऑनलाइन शिक्षणाला बहुसंख्य भारतातील मुले वंचितच आहेत. जी शिक्षण घेतात तेही अभ्यासक्रम सोडून बरेच काही गमावतात, असे निरीक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. विस्मया संतोष कुलकर्णी यांनी नोंदवले आहे.

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना त्या म्हणाल्या, मी अनुभवाने सांगते की, विद्यार्थी सतत गॅजेटबरोबर राहिल्याने त्यांच्या सामाजिकीकरणाला खीळ बसते. त्यांचा स्क्रीनटाईम वाढला आहे. समवयस्क मुलांशी त्यांचा संवाद हरवला आहे. शाळेच्या मैदानातील खेळांच्या अभावामुळे शारीरिक हालचालींना फारशी संधी नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरडेपणा, एकाकीपणा वाढला आहे. चिडचिड व्यक्त करण्याचा काही विद्यार्थी प्रयत्नही करत आहेत. यामुळे शिक्षकांचं आपल्या आयुष्यातील योगदान किती महत्त्वाचं आहे. शाळेच्या छताखाली, शिक्षकांबरोबर मिळणाऱ्या ऑफलाइन शिक्षणाचे महत्व अधोरेखित होतं. 

प्रत्येक गोष्ट शिक्षकांनी शिकवायलाच लागत नाही. बऱ्याच गोष्टींमध्ये मुलं शिक्षकांचं अनुकरण करत असतात. यू ट्यूब, गुगल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बरीच माहिती मिळते पण त्याचे योग्य फिल्टरेशन करून उपयोगी आणि ऍप्लिकेबल ज्ञान कसं मिळवायचं ही कला आभासी शिक्षणात मिळू शकत नाही. मुलांकडे उपजत बरीच कलाकौशल्ये असतात. शिक्षकांनी त्यांना प्रेरणा देण्याची, त्यांना परिस्थितीशी झगडायला शिकवण्याची ताकद देण्याची गरज असते. शिक्षकाचा योग्यवेळी हळवा तर योग्य वेळी कणखर होणारा आवाज, पाठीवर दिलेली शाबासकी, चार कौतुकाचे शब्द, विद्यार्थ्यांची कान उघाडणी आभासी अवकाशात शक्‍य नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

शिक्षकाने विविध विषयांच्या अभ्यासाची गोडी लावत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लावायचा असतो. अभ्यासावर प्रेम करायला शिकवताना त्यांच्या आवडीनिवडी हेरून त्या विषयी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यांना त्या जपायला उद्युक्त करावं लागतं. शाळा हे मुलांचे सेकंड होम असतं. हे सगळं विद्यार्थी-शिक्षक एकमेकांच्या सहवासात असतील तरच शक्‍य होते. 
- प्रा. विस्मया संतोष कुलकर्णी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com