Rural Education Crisis : शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षण व्यवस्था ढासळली; मुले शिक्षणासाठी गोव्यात

education system : शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याची वेळ येत असल्याची गंभीर बाब सावंतवाडी पंचायत समितीच्या बैठकीत समोर आली. या मुद्द्यावर सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
school closure due to teacher shortage

school closure due to teacher shortage

sakla

Updated on

सावंतवाडी : तालुक्यात गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या सर्व मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांमध्ये पदवीधर शिक्षकच नसल्याने, भविष्यात येथील मुले शेजारच्या गोवा राज्यात शिक्षणासाठी जातील आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या हद्दीतील शाळा कायमच्या बंद होतील. त्यामुळे तातडीने दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध करून द्या; अन्यथा भावी पिढी माफ करणार नाही, अशी आक्रमक मागणी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी मासिक बैठकीत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com