पोलिस बंदोबस्तात जेसीबीने ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अनेक दिवसांपासून या बांधकामामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळत नव्हती.
रत्नागिरी : मिऱ्या- नागपूर महामार्गाच्या (Mirya-Nagpur Highway) चौपदरीकरणामध्ये अडथळा ठरलेली १५ बांधकामे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. तहसीलदार राजाराम म्हात्रे (Tehsildar Rajaram Mhatre) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जेसीबीने ही घरे पाडून रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.