वेळास-साखरी समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

बाणकोट सागरी पोलिसांनी घेतले ताब्यात; २० ते २५ वर्षांचा तरुण असल्याचा प्राथमिक अंदाज
वेळास-साखरी समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील वेळास व साखरी दरम्यान समुद्र किनारी लाटांवर कचऱ्यासोबत एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह वाहून आला आहे. आज(ता.23) दुपारी २ वाजता हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. ''घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामा केला करुन मृतदेह पोस्टमार्टेम करण्यासाठी मंडणगड येथे पाठवण्यात आला आहे''अशी माहितील बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम पीठे यांनी दिली आहे

समुद्रकिनारी साधारण ४ ते ५ किमी चालत जीवरक्षक यांना मदतीला घेत पोलीस घटनास्थळी गेले. त्याठिकाणी समुद्रातील कचऱ्यासोबत एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंगावर एकही कपडा नसलेले हे शरीर पाण्यात फुगलेल्या अवस्थेत दिसत होते.

वेळास-साखरी समुद्र किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात : नागरिकांसाठी 'हे' हेल्पलाईन

पंचनाम्यासकट सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 6 / 21 कलम 174 CRPC दाखल करण्यात आले आहे. सदर पुरुषाचे वय हे २० ते २५ वर्षा दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत माहिती मिळताच संबंधित नातेवाईक यांनी बाणकोट पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन उत्तम पीठे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com