esakal | पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू

महावितरणच्या तुटलेल्या तारेशी संपर्क आल्याने तिचा मृत्यू झाला.

पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी): पोफळी पंचधारा धनगरवाडी येथील धनश्री सखाराम खरात या १४ वर्षाच्या मुलीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पोफळी टीआरटी मारूती मंदिर परिसरात ही घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार समोर आला. महावितरणच्या तुटलेल्या तारेशी संपर्क आल्याने तिचा मृत्यू झाला. दोन दिवसापासून पोफळी मारूती मंदिर टीआरटी परिसरातील डोंगराचा काही भाग खाली कोसळला होता. दरडींमुळे महावितरणची विद्युत वाहिनी तुटली होती.

हेही वाचा: रत्नागिरी जिल्ह्यात २१५ गावे काळोखात; पुराचा फटका

या घटनेची दोन दिवसानंतरही महावितरणने दखल घेतली नाही. धनश्री खरातसह तिची बहिण पायवाटेवरून जात असताना तुटलेल्या तारेशी भाग्यश्रीचा संपर्क आला आणि जाग्यावरच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोफळी गावातील चंद्रकांत सुवार, भिमराव बामणे, अनंत साळवी, दादा साळवी, अनंत पवार, संकेत सुवार, अलोरे - शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप पाटील यानी घटनास्थळी भेट दिली पोफळी पंचधारा धनगरवाडी येथील धनश्री सखाराम खरात या १४ वर्षाच्या मुलीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पोफळी टीआरटी मारूती मंदिर परिसरात ही घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार समोर आला. महावितरणच्या तुटलेल्या तारेशी संपर्क आल्याने तिचा मृत्यू झाला. दोन दिवसापासून पोफळी मारूती मंदिर टीआरटी परिसरातील डोंगराचा काही भाग खाली कोसळला होता. दरडींमुळे महावितरणची विद्युत वाहिनी तुटली होती.

हेही वाचा: Konkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर

या घटनेची दोन दिवसानंतरही महावितरणने दखल घेतली नाही. धनश्री खरातसह तिची बहिण पायवाटेवरून जात असताना तुटलेल्या तारेशी भाग्यश्रीचा संपर्क आला आणि जाग्यावरच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोफळी गावातील चंद्रकांत सुवार, भिमराव बामणे, अनंत साळवी, दादा साळवी, अनंत पवार, संकेत सुवार, अलोरे - शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप पाटील यानी घटनास्थळी भेट दिली

loading image
go to top