
- डॉ. सुनिल कुलकर्णी
रासायनिक अभियांत्रिकी शाखेचा संबंध आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये येतो. आपण वापरात आलेले कपडे (पॉलिमर इंजिनिअरिंग), मोबाइलला कव्हर, फास्टफूड (फूड टेक्नॉलॉजी), इंधन (पेट्रोलियम इंजिनिअरिंग), लॅपटॉप (मटेरियल सायन्स), पिण्याचे पाणी (एन्व्हॉरन्मेंटल अँड वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजिस) येथपासून ते ऑफिसमधील वेगवेगळ्या उपकरणापर्यंत कित्येक ठिकाणी रासायनिक अभियांत्रिकीचा आविष्कार पाहायला मिळतो. युनिट ऑपरेशन्स आणि युनिट प्रोसेसेस तसेच मेकॅनिकल ऑपरेशन्स आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत. जर आपण आपले शरीर एक प्लांट समजले तर त्यामध्ये साईझ रिडक्शनपासून मेम्बरने सेपरेशनपर्यंतची सारी प्रक्रिया होत असलेली आढळते. चहा बनवणे, स्वयंपाक करणे, भाजी कापणे, कपडे धुणे इत्यादी दररोजचे आपले काम कोणत्या ना कोणत्या केमिकॅल इंजिनिअरिंगमधील युनिट ऑपरेशनचा भाग आहेत. मास ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर आणि रिअॅक्टिव इंजिनिअरिंग हे केमिकॅल इंजिनिअरिंगचे अविभाज्य घटक आहेत.