माऊंट युनामवर पुन्हा तिरंगा फडकविणार

माऊंट युनामवर पुन्हा तिरंगा फडकविणार

माऊंट युनामवर पुन्हा तिरंगा फडकविणार

ग्रिहिथा विचारे ः दुखापत, खराब हवामानामुळे मोहिम अर्धवट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : भल्याभल्यांना अवघड वाटणारे ट्रेक लीलया पार करणाऱ्या नऊ वर्षाच्या ग्रिहिथा सचिन विचारे हिने युनाममध्ये ६ हजार ११० दहा मीटर उंचीवर भारताचा तिरंगा फडकवण्याचा निर्धार केला आहे. पायाच्या दुखापती मुळे आणि खराब हवामाना मुळे ग्रिहिथा अर्ध्यावर ही मोहिम सोडावी लागली. परंतु पुन्हा आपण ही मोहिम फत्ते करून देशाचा तिरंगा फडकवू, असा विश्वास ग्रिहिथा हिने व्यक्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्याची सुकन्या ग्रिहिथा सचिन विचारे म्हणजे महाराष्ट्राची हिरकणी, असे म्हणावे लागले. गिर्यारोहणातील अनेक नवनवीन विक्रम आतापर्यंत तिच्या नावावर जमा झाले आहेत. नेपाळमधला माऊंटएव्हरेस्ट बेस कॅम्प, मलेशिया इथलं माउंट किनाबालू शिखर, त्यासोबतच सह्याद्रीतला वजीर सुळका, नवरा नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकाराई सुळका, डांग्या सुळका असे अनेक कठीण ट्रेक तिने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
आणखीन एक नवीन विक्रम स्वतःच्या नावावर करण्याचा तिचा निर्धार आहे. हिमाचल प्रदेश इथल्या बारालाचा पास इथून काही किलोमीटर पुढे झास्कर पर्वतरांगांमध्ये असलेल्या ६११० मीटर उंचीच्या माउंट युनामवर ग्रिहिथा भारताचा तिरंगा फडकवणार होती. उणे दहा अंश सेल्सिअस इतकं हाडं गोठवणार तापमान, कधीही होणारी हिमवृष्टी, बर्फाने झालेले डोंगर, निर्मनुष्य परिसर, अशी आव्हानात्मक परिस्थिती समोर असताना तिने या मोहिमेला सुरुवात केली. २९ मे रोजी तिने या मोहिमेची सुरवात केली. मात्र ५०५० मीटर उंचीवर पोचून पुढचा ५२०० मीटर बेस कॅम्प गाठण्याआधीच पायाच्या दुखापतीमुळे आणि खराब हवामानामुळे ग्रिहिथाला १ तारखेला खाली बेसकँपला यावे लागले. ग्रिहिथाला भरतपूर वरून लगेच मानली येथे आणण्यात आले. ती आता बरी असून आराम करत आहे. मी युनामला पुन्हा येईन आणि ६११० मीटर उंचीवरून भारताचा तिरंगा फडकवीन हा निर्धार करून ग्रिहिथाने भरतपूर बेसकँप सोडले.
------
खराब हवामान आणि दुखापत
माऊंट युनामच्या मोहीमेला ग्रिहिथा विचारे हिने २९ मे रोजी सुरवात केली होती. मात्र ५०५० मीटर उंची गाठून पुढचा ५२०० मीटर बेस कॅम्प गाठण्याआधी तिच्या पायाला दुखापत झाली त्यात खराब हवामानामुळे तिला १ जूला खाली बेस कॅम्पला यावे लागले.


फोटो
-rat१०p१५.jpg-
२४M८९२१२
रत्नागिरी- माऊंट युनामसर करण्याच्या मोहिमेवर गेलेली ग्रिहिथा विचारे.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com