
शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ ते २४ नोव्हेंबरला दुपारी सव्वाच्या सुमारास निदर्शनास आली.
रत्नागिरी : शहरातील छत्रपती नगर, साळवी स्टॉप येथील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने ११ तोळे सोन्यासह ३ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ ते २४ नोव्हेंबरला दुपारी सव्वाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीधर राजाराम सावंत (वय ६२, रा. छत्रपतीनगर, राव बंगला, साळवी स्टॉप, रत्नागिरी) हे पत्नीसह १६ नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने कसोप येथे पत्नीच्या माहेरी कुटुंबासह गेले होते. त्यानंतर ते मंगळवारी रत्नागिरीत परतले. मात्र, लगेचच पत्नीला घेऊन डॉक्टरकडे गेले होते. ते दुपारी घरी आले, त्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतील खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हेही वाचा - पत्नी कागदपत्रे देत नसल्यामुळे जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने केले वार -
बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता, कपडे व साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले होते तर खिडकीचे गज कापलेले होते. घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आज प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सहा हजाराची रोकड असा ३ लाख ४८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी श्रीधर सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संपादन - स्नेहल कदम