सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात राहणार्‍यांना करावे लागते 3. कि.मी पायपीट.....

Their footpath for essential goods was 3. km kokan marathi news
Their footpath for essential goods was 3. km kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची मदत घेण्यासाठी कुंभार्ली घाटातील भाट्ये येथे राहणारे धनगर समाजातील नागरिकांनी तब्बल तीन कि.मी पायपीठ केली. सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेने 10 कुटूंबांना महिनाभर पुरेल इतके साहित्य दिले. 

पोफळी गावापासून जवळ असलेल्या कुंभार्ली घाटातील दर्‍या - खोर्‍यात धनगर आणि कातकरी समाजाची लोकवस्ती आहे. यातील अनेकजण दुधाचा व्यवसाय करतात. दररोज सकाळी डोंगरातील पायवाटेने दुधाची किटली घेवून धनगर बांधव पोफळी, शिरगाव येथे येतात. येथे घरोघरी दुधाची विक्री झाल्यानंतर जाताना रिकाम्या किटल्यांमधून जीवनावश्यक वस्तू घेवून जातात.

सोशल मिडियावरुन मदतीचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सह्याद्रीच्या दर्‍या खोर्‍यात राहणार्‍या धनगर आणि कातकरी समाजातील लोकांचे हाल झाले आहेत. अनेकांनावर उपासमारीची वेळ आली आहे. सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे काहींनी आपली व्यथा सांगितली. या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी फेसबुकवरून दानशूर लोकांना मदतीचे आवाहन केले.

दिला मदतीचा हात ​

संस्थेच्या बँक खात्याची माहिती दिली. त्यानंतर अनेकांनी मदतीचा हात दिला. संस्थेच्या बँक खात्यात जमा झालेल्या पैशातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यात आली. सोनल प्रभुलकर, सदफ कडवेकर, समीनदर गुरव, संजय सुर्वे यांनी कुंभार्ली घाटातील हनुमान मंदिरापर्यंत जीवनावश्यक वस्तू नेल्या. भाटे येथे राहणारे धनगर समाजातील नागरिक तीन कि.मी पायपीट करत हनुमान मंदिरापर्यंत आले. तेथे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने भाटे येथील एका वृद्ध महिलेला धनगर बांधवांनी डोळीच्या सहाय्याने शिरगावमध्ये उपचारासाठी आणले. तेथे काहींनी आम्हाला त्यांच्या व्यथा सांगितल्यानंतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने संस्थेने या बांधवांना पाठबळ दिले. दररोज जेवढे पैसे जमा होतात दुसर्‍या दिवशी त्या पैशाची मदत पोहच केली जाते. आठवडाभर हे काम सुरू आहे. कळकवणे, तिवरे, कुंभार्ली या ठिकाणीही मदत पोहच केली जात आहे.

सोनल प्रभुलकर , शिरगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com