...तर जयंत पाटील भाजपमध्ये असते : नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत भयावह परिस्थिती आहे, असेच मी म्हणू शकतो. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडुन प्रयत्नच होत नाहीत. ओबीसीचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे राणे समितीच्या अहवालात कुठेही नाही.

रत्नागिरी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे हे सरकार नाही. त्यामुळेच सुनावणी दरम्यान वकील गैरहजर राहिले आणि अपेक्षित कागदपत्रही दिली नाहीत. अशी भयावह परिस्थिती आरक्षणाबाबत आहे. स्थगिती उठावी, असा अर्जही सरकारणे दिलेला नाही, असे परखड मत भाजपचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले. 

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत भयावह परिस्थिती आहे, असेच मी म्हणू शकतो. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडुन प्रयत्नच होत नाहीत. ओबीसीचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे राणे समितीच्या अहवालात कुठेही नाही. उलट कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता 52 टक्केच्या वर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती पाहुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असी शिफारस मी केली आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले. 

भविष्यात सेना-भाजप अशी युती होणार नाही. मात्र लवकरच वेगळे सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीतील दोन पक्ष कुठेच दिसत नाही. उद्धव ठाकरे तेवढेच बोलताना दिसतात. यावरून दोन्ही पक्षांचे काय राजकारण सुरू आहे, हे तुम्हीच ओळखा. भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला घेऊन सत्ता स्थापन करणार का? या प्रश्‍नाला मात्र त्यांनी बगल दिली. अभिनेता सुशांत राजपूरकर याचा खुन झाला असून ती आत्महत्या असल्याचे दाखवून पचवले जात आहे,असा आरोप त्यानी केला. 
 
...तर जयंत पाटील भाजपमध्ये असते 
पुढील पाच वर्षे हे सरकार राहिल, असे म्हणण्याचा अधिकार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना नाही. हे सरकार स्थापन झाले नसते तर पाटील भाजपमध्ये असते. मी आता काही बोलणार नाही, सांगलीत जाऊन त्यांचा समाचार घेऊ, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. 

सेनेला हद्दपार केल्यास जिल्ह्याचा विकास 
शिवसेनेला जिल्ह्यूान हद्दपार केल्याशिवाय विकास होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदीवर भाजपची एकहाती सत्ता येणे आवश्‍यक आहे. सर्वकाही आम्हीच हा एककलमी कार्यक्रम उलटुन लावण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला पुढील पाच वर्षे संधी द्या. जिल्ह्याचा कायापालट करू, असे आवाहन नाराणय राणे यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then Jayant Patil will in BJP Narayan Rane Comments On