कोकण रेल्वेचा मार्ग वाहतूक सुरळीत; चक्रिवादळाचा धोका नाही

कोकण रेल्वेचा मार्ग वाहतूक सुरळीत; चक्रिवादळाचा धोका नाही
Summary

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनचे नियोजन करून आज पहाटेपासूनच वादळाच्या आगमनानंतर होणाऱ्या नुकसानीबाबत किंवा मनुष्य हानीबाबत सतर्क राहत सर्व तयारी केली होती.

कणकवली (सिंधुदुर्ग ) : कोकण किनारपट्टीवर (Konkan coast) तौक्ते चक्रीवादळाने (Taukte Hurricane) आज पहाटेपासून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असली तरी कोकण रेल्वेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईहून मडगावपर्यंत धावणाऱ्या सर्व गाड्या नियोजित वेळेत धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (There is no danger of cyclone at Sindhudurg)

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाने निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे केरळ कर्नाटक आणि गोवा राज्याला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनचे नियोजन करून आज पहाटेपासूनच वादळाच्या आगमनानंतर होणाऱ्या नुकसानीबाबत किंवा मनुष्य हानीबाबत सतर्क राहत सर्व तयारी केली होती. दस्तुरखुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये पहाटेपासूनच हजेरी लावली होती. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पहाटेच्या सुमारास घेतली.

कोकण रेल्वेचा मार्ग वाहतूक सुरळीत; चक्रिवादळाचा धोका नाही
हवामान विभागाचा इशारा; सिंधुदुर्ग किनाऱ्यावर 'या' तीन दिवसात मुसळधार पाऊस

दरम्यानच्या कालावधीत पहाटे चक्रीवादळाचा प्रवेश गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला. आज सकाळी नऊच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकलेल्या वादळामुळे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. मात्र कोकण रेल्वे मार्गावरील सर्व वाहतूक सुरळीत सुरू होती. मुंबईहून येणारी कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, जबलपुर एक्सप्रेस नियोजित वेळेत धावत होत्या, तसेच दिल्लीकडेजाणारी निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस, मंडगाव सीएसटी मांडवी एक्सप्रेस तसेच केरळ वरून येणारी कोचुवेली एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेत धावत होती.(There is no danger of cyclone at Sindhudurg)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com