

Thimakka Dominates State-Level One-Act Play Competition in Pali
Sakal
पाली : प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत आयोजित भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत "थिमक्का" एकांकिका अव्वल ठरली आहे. बुधवारी (ता. 24) रात्री या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. सलग सहा दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यातील तब्बल 28 नाट्य संस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करून नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केले.