गुहागरमध्ये कोविड रुग्णालयाची तहान कोविड केअर सेंटरवर...

Thirst of Covid Hospital at Covid Care Center
Thirst of Covid Hospital at Covid Care Center
Updated on

गुहागर (रत्नागिरी)  : कोविड रुग्णालयाची तहान कोविड केअर सेंटरवर भागविण्याची वेळ गुहागरमधील प्रशासकीय अधिकार्‍यांवर आली आहे. 150 खाटांचे रुग्णालय आणि 50 खाटांच्या कोविड केअर सेंटरसाठी अपेक्षित जागाच तालुक्यात मिळालेली नाही. त्यामुळे खरे-ढेरे महाविद्यालयाचे वसतिगृह ताब्यात घेवून 14 खाटांचे तात्पुरते कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. मात्र या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली नसल्याचे तहसीलदार लता धोत्रे यांनी सांगितले.

गुहागर तालुक्यात कोविड रुग्णालय तयार करण्याच्या सूचना महिनाभरापूर्वी तहसीलदारांना प्राप्त झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत तहसीलदारांनी निरायम रुग्णालय, नवोदय विद्यालय, युसुफ मेहरअली हेल्थ सेंटर, वेळणेश्वरमधील तीन इमारती, शासकीय विश्रामगृहापलीकडे असलेली रिकामी इमारत आदी इमारतींचे पर्याय शोधले. मात्र निरामय रुग्णालय, नवोदय विद्यालयाच्या इमारती 2001 पासून बंद असल्याने दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रीक फिटिंग, पाईपलाईन आदी गोष्टी दुरुस्त कराव्या लागणार आहेत. न्यायालयाच्या नव्या इमारतीचा पर्याय चांगला होता. ही इमारत वापरण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या परवानगीची आवश्यकता असते. हा विषय केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फतच सोडविला जावू शकतो.

प्रशासन हतबल ; गुहागर तालुक्यात जागेची वानवा ​

युसुफ मेहरअली हेल्थ सेंटर खासगी संस्थेचे आहे. या संस्थेने संस्थात्मक विलगिकरण कक्षासाठी परवानगी दिली आहे. मात्र ते रुग्णालय असल्याने तेथे कोविड संदर्भात उपचार करता येणार नाहीत. वेळणेश्वरमधील नंदन प्रिव्हिलेज रिसॉर्ट, बंद असलेला फळ प्रक्रिया कारखाना आणि अन्य एका हॉटेलबाबतही तहसीलदारांमाफत चौकशी करण्यात आली. मात्र त्या इमारतीही शासनाला मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे आता एका इमारतीचा पर्याय शिल्लक आहे. सदर इमारतीचे केवळ बांधकाम झालेले आहे. त्यामुळे तेथे पाणी, स्वच्छतागृह यांची काय स्थिती आहे त्याची पाहणी महसूल प्रशासन करत आहे.


150 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने तालुका प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे 50 खाटांच्या कोविड केअर सेंटरसाठी प्रशासनाच्या हालचारी सुरू आहेत. सध्या खरे ढेरे महाविद्यालयाचे मुलींचे वसतीगृहाची इमारत तात्पुरती घेण्यात आली आहे. तेथे जामसुतला सापडलेल्या कोरोनाग्रस्ताला ठेवण्यात आले आहे. येथे 14 खाटांची क्षमता आहे. त्यामुळे पर्यायी इमारत मिळेपर्यंत ही इमारत कायदेशीररित्या अधिग्रहित करण्याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- तुम्हाला सतत तहान लागते का ...? मग वाचाच                                                                                                 येत्या दोन दिवसांत स्वतंत्र स्टाफ
जामसुतमधील 50 वर्षीय कोरोनाग्रस्ताला येथे ठेवण्यात आले असून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दिवसातून दोनवेळा त्याची तपासणी करून येतात. इमारतीबाहेर एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत स्वतंत्र स्टाफ (नर्स, डॉक्टर, शिपाई) अशी व्यवस्था आरोग्य विभाग करणार आहे.

महाविद्यालयाच्या इमारतीत कोरोना रुग्णालय व्हावे ही दुर्दैवी घटना आहे. तालुक्यात आरजीपीपीएल, प्रिंस खेडेकर हॉस्पिटल असताना आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार असे जाहीर केलेले असताना महाविद्यालयाची इमारत कशी घेतली गेली?
सुरेश सावंत, माजी सेक्रेटरी, गुहागर एज्युकेशन सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com