
पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात तब्बल 35 वर्ष जुन्या जाहीर सूचनेची चर्चा सुरू आहे. पाणी फिल्टर होऊन येत नसल्याने नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे अशा आशयचे तत्कालीन ग्रामपंचायत चे जाहीर सूचना पत्रक आहे. या जाहीर सूचनेच्या पत्रकाचा फोटो सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे कारण आज घडीला देखील पालीकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. तब्बल साधारण 25 कोटीची शुद्ध पाणी पुरवठा योजना लाल फितीत अडकलेली आहे.