विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दापोलीत सरसावले अनेकांचे हात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

चाकरमानी निघून गेल्यावर काय, असा प्रश्‍न उभा राहिलेल्यांसाठी काही संवेदनशील लोक पुढे आले आहेत

दाभोळ (रत्नागिरी) : मोबाईल नसलेल्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांवर शिक्षण तसेच अभ्यासाला वंचित होण्याची वेळ आली आहे. चाकरमान्यांचे मोबाईल हा त्यावरचा उपाय काही आर्थिक मागासांनी शोधला. मात्र, चाकरमानी निघून गेल्यावर काय, असा प्रश्‍न उभा राहिलेल्यांसाठी काही संवेदनशील लोक पुढे आले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल दिले असून, त्यांच्या अभ्यासाची सोय केली आहे.   

पंचनदी येथील कुटरेकर प्रशालेत आठवी ते दहावीचे ऑनलाइन क्‍लासेस सुरू आहेत. यासाठी ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांनी रानावनात झोपडी बांधून त्यात ऑनलाइन अभ्यास सुरू केला आहे; मात्र आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांच्या अभ्यासात अडथळा येत होता. तो दूर करण्यासाठी मुंबईतून गावी आलेल्या चाकरमान्यांचे मोबाईल घेऊन एका मोबाईलवर चार ते पाच विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला होता. मात्र, आता चाकरमानी पुन्हा मुंबईला गेले आहेत. दरम्यान, मुख्याध्यापक सुनील देसाई यांनी देणगी देणाऱ्यांचे आभार मानले.

आवाहनाला प्रतिसाद

शाळेचे मुख्याध्यापक सुनील देसाई यांनी जुने मोबाईल देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पंचनदी येथील सुनील मोडक यांनी, एक नवीन मोबाईल आघारी येथील सुशांत रहाटे याला दिला. पुणे येथील प्रसाद केळस्कर व अजय देशपांडे, भूषण सातपुते यांनीही प्रत्येकी एक नवीन मोबाईल विद्यार्थ्यांना दिला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: those students who not economically stable helps to online study to give a mobile phones in ratnagiri